A2Z सभी खबर सभी जिले कीताज़ा खबर
Trending

शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

नागपूर प्रतिनिधि

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले.शहीद जवानाचे पार्थिव गावात आज अशोक वाटिका अकोला येथे पोहोचले असता महार बटालियन आजी माजी सैनिक आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने आम्ही शहीद सैनिकाचा ट्रक सजवला त्यानंतर विश्व भूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे महार रेजिमेंट सुरू झाली होती.त्यामुळे शाहीदाचे पार्थिव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर ठेवून शाहिदाचे कुटुंबाचे हस्ते बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देवून पुष्प अर्पण करीत शहीद जवान प्रवीण जंजाळ ह्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहीदाचे पार्थिव त्यांचे
मोरगाव भाकरे गावात अकोल्यावरून नेताना डाबकी भौरद नाल्याला पूर असल्याने व्याळा मार्गे गायगाव भौरद ते मोरगाव नेण्यात आले. वाटेत मोठ्या प्रमानात नागरिक शहीदाला अभिवादन करायल जमले होते.

शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
Reporter Devashish tokekar

Back to top button
error: Content is protected !!