A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

◆ *बोरिवलीतील सीआरझेड जागेवर उभारलेल्या बेकायदा स्टुडिओवर कारवाई कधी?*

◆ *बोरिवलीतील सीआरझेड जागेवर उभारलेल्या बेकायदा स्टुडिओवर कारवाई कधी?*

Press note
Nagpur pratinidhi

◆ *बोरिवलीतील सीआरझेड जागेवर उभारलेल्या बेकायदा स्टुडिओवर कारवाई कधी?*
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बोरिवलीतील सर्वे नं.73/1, सी.टी.एस. नं. 1818 (पार्ट), 1819, व्हिलेज एक्सर बोरिवली येथील धर्मानगर सीआरझेड जागेवर 50 ते 60 हजार चौरस फूट भूखंडावर पालिकेचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आला आहे. मड येथील बेकायदा स्टुडिओंवर कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाने चित्रपट स्टुडिओ उभारणीला परवानगी देणे बंद केले होते. मात्र परिमंडळ 7 मधील बोरिवली पश्चिमेकडील धर्मानगर येथील मोकळ्या जागेवर बेकायदेशिरपणे स्टुडिओ उभारण्यात आला असून, त्यात चित्रीकरण ही सुरु आहे. याबाबतीत अनेक तक्रारी केल्या गेल्या असूनही अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस तोडक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे बोरिवलीतील या बेकायदा स्टुडिओवर कारवाई केव्हा होणार? असा सवाल नागरीक मुंबई महानगरपालिचे आर/मध्य विभागाला विचारू लागले आहेत.
बेकायदा स्टुडिओमध्ये वेडिंग कामांसह कॅटरिंग आणि इतर कामांकरिता सुमारे 40 ते 50 गॅस सिलेंडरचा वापर केला जात असून स्टुडिओमुळे लगतच्या रहिवाशी व समोरच असलेल्या पेट्रोलपंप मूळे काही घटना घडून मोठी जिवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या स्टुडोओमध्ये शेकडो कामगार काम करत असून त्यांच्या सुरक्षेची काडीमात्र चिंता पालिकेला नाही. महत्त्वाचे म्हणजे पालिकेचे बेकायदा स्टुडिओमुळे करोडो रूपयांचा महसूल बुडत आहे. तरी याची दखल घेऊन पालिका कधी कारवाई करणार हा पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vande Bharat live tv news Nagpur
Reporter Devashish Tokekar

Back to top button
error: Content is protected !!