A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

वनपरिक्षेत्र बल्लारशाह व रणरागिणी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमाने एक पेड मा के नाम कार्यक्रमाचे आयोजन.

एक पेड मा के नाम कार्यक्रमाचे आयोजन.

WhatsApp Image 2024 07 31 at 12.26.43

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : वनपरिक्षेत्र बल्लारशाह व रणरागिणी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक२८/०७/२०२४ रोजी नियत क्षेत्र केम कक्ष क्रमांक 574 मध्ये एक पेड मा के नाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम रणरागिनी हिरकणी फाउंडेशन बल्लारपूर तर्फे कार्यक्रमाला उपस्थित विविध धर्माचे धर्मगुरू व मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला सिंधी समाज धर्मगुरू श्री सुभाष जाग्यसी हिंदू धर्माचे पंडित गीत नारायण महाराज पंजाबी समाजाचे प्रमुख पाठीजी मुस्लिम समाजाचे मौलाना मोहम्मद इजहार ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर कुरूस्सरी बुद्ध धर्मागुरु धम्मघोस मत्ता भंतेजी, एस एन डी टी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर इंगोले वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशा प्रादेशिक श्री नरेश रामचंद्र भोवरे, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती संजना मूलचंदानी व हिरकणी युवा मंच अध्यक्ष श्री शुभम दवणे हिरकणी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ स्नेहा भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर मान्यवरांनी कार्यक्रमा बाबत जनजागृती वर मार्गदर्शन केले त्यानंतर वनशेत्र मध्ये जाऊन धर्मगुरूंच्या हस्ते एकतेचे प्रतीक ट्री ऑफ युनिटी म्हणून वटवृक्षाची लागवड करून वृक्षरोपणाची सुरुवात करण्यात आली सदर परिसरात २१०० रोपे लागवटीचे नियोजन करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने बल्लारपूर शहरातील महाविद्यालय, व्यापारी संघटना, शासकीय यंत्रणा, प्रभात फेरी ग्रुप ,सेवाभावी संस्था आणि पर्यावरण प्रेमी कडून वृक्षारोपण केले जाणार आहे वृक्षारोपण वन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कुमारी खुशी भाटिया यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बल्लारपूर येथील नागरिक उपस्थित होते तसेच वनपरिक्षेत्र बल्लारशाह येथील वन कर्मचारी उपस्थित होते नियत क्षेत्र केम कक्ष क्रमांक ५७४ संत चावला आयटीआय चे जवळ असलेल्या वृक्षारोपण स्थळी येऊन वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्नेहा भाटिया व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री नरेश रामचंद्र बोरे यांनी केले आहे

Back to top button
error: Content is protected !!