A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

◆ *तळोजात सव्वा दहा लाखांचा गुटखा जप्त* ◆ गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक

◆ *तळोजात सव्वा दहा लाखांचा गुटखा जप्त* ◆ गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक

प्रेस वार्ता
विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई

◆ *तळोजात सव्वा दहा लाखांचा गुटखा जप्त*
◆ गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक
——–
विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई
नवी मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने तळोजा येथील घोटगावातील एका घरावर मंगळवारी (ता. 6) मध्यरात्री छापा टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुमारे सव्वा दहा लख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या मोहम्मद आबीद खान (25) या तरुणाला अटक केली आहे. या आरोपीने हा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कोठून आणला याबाबत गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
तळोजा फेज-1 परिसरातील घोटगाव येथील एका चाळीत भाड्याने राहणाऱ्या तरुणाने राज्य सरकारने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखूचा साठा विक्रीसाठी साठवणूक करून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट रच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व त्यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री चाळीतील घरावर छापा मारला.

*सुगंधित पानमसाला ताब्यात*
गुन्हे शाखेच्या पथकाने घराची तपासणी केली असता, नायलॉनच्या गोण्यांमध्ये तब्बल सव्वा दहा लाख रुपये किमतीचा गुटखा, सुंगधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हे शाखेने गुटख्याचा साठा जप्त करून गुटख्याचा साठा करून ठेवणाऱ्या मोहम्मद खान याच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष नागपूर
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन जिल्हा अध्यक्ष नागपूर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!