A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील बॉक्सिंग महिला खेळाडू

संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र

भद्रावती ( ता . ) स्थानिक भद्रावती येथिल विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीतील विद्यार्थिनी संजना रणदिवे, पलक बुक्या आणि श्रुती कुत्तरमारे यांची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली बॉक्सिंग संघात निवड झाली. गोंडवाना विद्यापीठ, महिला बॉक्सिंग संघ दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2024 ला पंजाब येथील गुरु काशी विद्यापीठ,भटिंडा येथे अखिल भारतीय राष्ट्रीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग महिला स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचा संघ दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून पंजाब येथील गुरु काशी विद्यापीठ, भटिंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतर विद्यापीठ, बॉक्सिंग महिला स्पर्धेकरिता रवाना होणार आहे. या संघात विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील संजना रणदिवे, पलक बुक्या आणि श्रुती कुत्तरमारे या खेळाडू महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली महिला बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक म्हणून गोंडवाना विद्यापीठने भद्रावती येथील बॉक्सिंग महिला प्रशिक्षक लता इंदुरकर (तिवारी ) यांची निवड करण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली महिला बॉक्सिंग संघ पंजाब येथील भटिंडा येथे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व आणि आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत.
महिला बॉक्सिंग संघात विवेकानंद महाविद्यालयातील संजना रणदिवे, पलक बुक्या आणि श्रुती कुत्तरमारे यांची निवड झाल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमनभाऊ टेमुर्डे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. पारेल्लवार, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, प्रा. मालेकर, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा, दाते, प्रा. बैरम, प्रा. खोके, प्रा. बेलगावकर, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Vande Bharat Live Tv News
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!