
राहूरी :शहाजी दिघे
राहूरी :अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम या संस्थेकडून अमृत कलश दर्शन व पूजन सोहळ्याचे आयोजन आंबिका माता मंदिर धानोरे घाट येथे करण्यात आले होते.
महाकुंभ अमृत कलश पूजन करावे असे आवाहन गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज व रामगिरी महाराज यांनी केले आहे. या निमंत्ताने सात्रळ येथील पुरोहित अभिजित कुलकर्णी गुरुजी व धानोरे पंचक्रोशीतील ११ जोडप्यांच्या हातून कलश पूजन व पाणीपुजन करण्यात आले.
अनुलोमचे भागजनसेवक पृथ्वीराज तांबे यांनी अनुलोम विषयी मार्गदर्शन केले. या पाणीपुजन सोहळा अतिशय सुदंर वातावरणात दक्षिण उत्तर वाहिनी असेलेल्या प्रवरा नदीचे तिरावर पुरातन धनेश्वर मंदिर तसेच अंबिका माता मंदिरात संपन्न झाले. यावेळी पदमश्री वि. वि. पा. सह. साखर कारखान्याचे संचालक किरण दिघे, अप्पासाहेब राधु दिघे, रंगनाथ भास्कर शिंदे, ज्ञानेश्वर संतू दिघे उपसरपंच ,दिगंबर अप्पासाहेब दिघे सदस्य ग्रामपंचायत धानोरे, राहुल संपत दिघे, राहुल चांगदेव दिघे, डॉ. प्रदीप दिघे,निवृत्ती शिंदे, बाजीरावनाना दिघे, प्रा. दिघे सर,बाळकृष्ण चोरमुगे, वसंतराव डुक्रे,गोरक्ष गणपत दिघे, दत्तात्रय माधव दिघे, योगेश गिते, अमोल नालकर, सुभाष सर्जेराव दिघे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.