A2Z सभी खबर सभी जिले कीChhattisgarh Elections 2023COVID-19FinanceInsuranceLok Sabha Chunav 2024MP Election 2023Technologyअन्य खबरेउत्तर प्रदेशकृषिटेक्नोलॉजीमनोरंजनराजस्थान विधानसभा चुनाव 2023लाइफस्टाइलवर्ल्डकप 2023

एक शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सौ सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी तत्कालीन समाज घडविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या दोघांनी नवीन समाजाची निर्मिती करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले असल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मौजे पैजारवाडी येथे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांचे उभारण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हे व्यक्तीला घडविते. सुसंस्कृत समाज निर्मितीला सहाय्यभूत ठरते. या ठिकाणी उभारण्यात आलेले या दोन्ही मान्यवरांचे पुतळे समाजाला प्रेरणा देतील.

याप्रसंगी मंचावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडीक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री गोपिचंद पडळकर, डॉ. विनय कोरे, अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, समित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

हिरवे गुरुजी यांनी कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यात 60 वर्षापूर्वी सुमारे 104 शाळा तसेच एका वसतिगृहाची उभारणी केली. हे अतुलनीय कार्य समाज नक्कीच लक्षात ठेवेल. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याच्या आठवणीची जाणीव नवीन पिढीला व्हावी, तसेच त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठीच या अर्धाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात आल्याचे आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे पारंपारिक पद्धतीने धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची परमपूज्य सदगुरु चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी हिरवे कुटुंबियातील बाजीराव हिरवे, तानाजी हिरवे, उल्हास हिरवे, उमेश हिरवे, विनोद हिरवे, प्रमोद हिरवे तर देशपांडे कुटुंबियातील शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती शैलजा देशपांडे, ऋषीकेश देशपांडे, स्मिता टिपणीस, माधवी देशमुख, अश्विनी भावे, स्वाती खोपकर, मुक्ता देशपांडे व त्यांचे कुटुंबिय तसेच मौजे पैजारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!