
प्रेस विज्ञप्ति
नागपुर शहर
भारतरत्न स्व राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर जिल्हा ( ग्रामीण ) युवक काँग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित
नागपूर :- आज २१ मे २०२५ रोजी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे ग्रामीण कॉंग्रेस कार्यालय, नागपूर येथे स्व. राजीव जि गांधी यांना श्रद्धांजली वाहुन युवक कॉंग्रेसच्या 28 पदाधिकार्यानी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होवून रक्तदान केले.
उन्हाळा आला की बहुतांश ब्लड बँक मध्य रक्ताचा तुटवडा पडतो त्यामुळे रुन्याच्या नातेवाईकाना रक्तासाठी वनवन फिरावे लागते परंतु अश्या परिस्थितीत रक्त मिळने कठीण असल्यामुळे रुग्णांना याचा भरपूर त्रास होतो त्यामुळे आज स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त एक मदतीचा हात म्हणून युवक काँग्रेसच्या पदाधिकारीरयाँणी मोठ्या संख्येने रक्तदान केले
हे रक्तदान शिबिर नागपुर जिल्हा ( ग्रामीण ) युवक कॉंग्रेस अध्यक्ष आशिष मंडपे जि यांच्या अध्यक्षते खाली तसेच भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव अजित सिंग जि, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष तथा नागपूर झोन युवक काँग्रेस प्रभारी आशिफ शेख जि यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडले, या शिबिरात महा. प्रदेश महासचिव सौरभ श्रीरामे, नागेश गीरहे, संदीप बैन,नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मुकेश केलवदकर, तौसीफ़ शेख, राजू रहांगडले, तुषार ढाकने, प्रमोद लांडगे, सौरभ रंगारी, अनस अंसारी, मो. इमरान शेख, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष मंडपे
अध्यक्ष
नागपुर जिल्हा ( ग्रामीण ) युवक कॉंग्रेस
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015