?php echo do_shortcode('[t4b-ticker]'); ?
A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

कात्रज सातारा हायवेवर खड्डे, पाण्याच्या डबक्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत असून पालिकेचे दुर्लक्ष

IMG 20250620 182635

IMG 20250620 182652

 

IMG 20250620 182653

पुणे: कात्रज सातारा हायवेवर कात्रज भागामध्ये गंधर्व लॉन्सच्या समोर रिमझिम पावसामध्ये सुद्धा या रस्त्यावर डबक्याचे स्वरूप पाहायला मिळते. या ठिकाणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे याच रोडवर अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेले पुणे महानगरपालिकेचे पावसाळी लाईनचे कामामुळे खोदून ठेवलेला रस्ता यामुळे वारंवार ट्रॅफिक जामची मोठी समस्या दैनंदिन निर्माण होत असून यावर पुणे महानगरपालिका प्रशासन व पुणे ट्रॅफिक विभाग कुठेही ठोस भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर नसल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले. पडलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी स्वरांचे वारंवार अपघात होतात त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. रस्त्याच्या बाजूला काही प्लॉट मालकांनी टाकलेली दगड मातेची भर त्यामुळे रस्त्याची उंची ही जमिनीच्या उंची पेक्षा खाली असून त्यामुळे या रस्त्यावर डबक्याचे स्वरूप पहायला मिळत आहे. हे सर्व अडचण पुणे महानगरपालिकेचे कात्रज विभाग अधिकारी संतोष पाटोळे तसेच कुणाल यादव यांना दिलेले असून सुद्धा यावर कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. तात्काळ या कात्रज सातारा रस्त्यावरील अडचणीची दखल घेऊन खड्डे तसेच रस्त्यावर साचणारे पाणी, रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दगड मातीच्या भारीमुळे झाकलेला अर्धा रस्ता उघडा करण्यात यावा. अशी स्थानिकानकडून मागणी करण्यात येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!