
श्री. संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर : श्री महर्षी विद्यामंदिर दाताळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाला गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश चांडक ,उपाध्यक्ष श्रीमती वसुधा कंचर्लावार, सचिव श्री दत्तात्रय कंचर्लावार , कोषाध्यक्ष श्री अनुपम चिलके ,सदस्य श्रीमती अलका चांडक, श्री वीरेंद्र जयस्वाल ,श्री उमेश चांडक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी मूर्ती मॅडम , उपमुख्याध्यापिका श्रीमती. निशा मेहता मॅडम उपस्थित होत्या. स्वातंत्र्य सैनिकांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्री गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री गिरीश चांडक सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी’ ये देश है वीर जवानों का’ हे मधुर देशभक्तीपर गीत सादर केले .वर्ग नववीची विद्यार्थिनी आभा ईश्वरकर हिने स्वातंत्र्य दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुकुल शिक्षा संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना देशाप्रती असलेले त्यांचे कर्तव्य बजावण्यास सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वर्ग बारावीचे विद्यार्थी सांझी अग्रहरी , अंश अरोरा यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग बारावीची विद्यार्थिनी सुरभी मूलचंदानी हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व क्रीडा शिक्षक तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.