[pj-news-ticker]

A2Z सभी खबर सभी जिले कीCOVID-19

चंद्रपूर जिल्हा/मनपा शालेय तायक्वांडो स्पर्धा उत्साहात पार पडली

चैनल से जुड़ने के लिए इमेज पर क्लिक करें

 

चंद्रपूर (दि. 22 ऑगस्ट) –
:- क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या अंतर्गत दिनांक 21 व 22 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी भवन, वरोरा येथे मनपा शहर व ग्रामीण स्तरावरील तायक्वांडो स्पर्धा भव्यदिव्य व पारदर्शक पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली व District Taekwondo Association of Chandrapur आणि air bone training center यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

✨ विशेष आकर्षण
स्पर्धेची काटेकोर देखरेख विशेष मोरेश्वर गायकवाड, क्रीडा अधिकारी, वाल्मीक खोब्रागडे, जिल्हा क्रीडा समन्वयक अधिकारी . क्रिडा अधिकारी यांनी केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. जयंत टेमुर्डे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री. अशोक वर्मा, श्री. सुनील बांगळे, श्री. गणेश मुसळे, श्री. नरेंद्र बोरीकर व श्री. गुरुदेव जुंबडे यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्णायक इंटरनॅशनल रेफरी तेजंकित भोंगडे व नॅशनल रेफरी रजत गायकवाड यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा लाभली.

🌟 मार्गदर्शन व नेतृत्व
अध्यक्ष श्री. अमन टेमुर्डे सर, श्री. अशोक वर्मा सर, उपाध्यक्ष श्री. तानाजी बायस्कर, श्री. सागर कोहळे व सचिव श्री. बजरंग वानखडे (NIS Coach, International Medallist) यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडली. नियमावली व गाईडलाईन्सचे पालन तसेच प्रत्येक संघाला योग्य मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य सहसचिव श्री. आकाश भोयर (राष्ट्रिय मेडलिस्ट ) व खजिनदार श्री. सचिन बोधाने (राष्ट्रिय मेडलिस्ट )यांनी केले. तसेच सल्लागार श्री. अक्षय हणमंते (राष्ट्रिय मेडलिस्ट), श्री. मुकेश पांडे (एन.आय.एस कोच) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सहाय्यक मंडळामध्ये पंकज चौधरी, पंकज शेंडे ,दिव्या नंदनवार व जयंत विधाते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

—🙌 त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, संघटन कौशल्यामुळे व खेळाडूंच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे ही स्पर्धा पूर्णतः पारदर्शक, यशस्वी व संस्मरणीय ठरली.

[yop_poll id="10"]
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!