A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्रमुंबई

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी मा. श्री. विशाल अडागळे यांची नियुक्ती

आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार

IMG 20250913 192303 1

IMG 20250913 192331

IMG 20250913 192406

पुणे: 13 सप्टेंबर 2025

    निर्भिड, तडफदार व युवा पिढीचे धडाडीचे पत्रकार मा. श्री. विशाल बाळु अडागळे यांची अवघ्या तीस दिवसात पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदावरून थेट पुणे जिल्हा अध्यक्षपदी पदोन्नती ही राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. गणेशजी कचकलवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मा. श्री. गणेशजी महाडिक, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. संतोषजी लांडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. श्री. कांताभाऊ राठोड, पुणे जिल्हा महिला सचिव सौ. अनघलक्ष्मी दुर्गा, यांच्या एकमताने बिनविरोध करण्यात आली. या निमित्ताने युवा ग्रामीण पत्रकार संघामध्ये कार्यरत असलेले पत्रकार मा. श्री. विशाल बाळु अडागळे यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी तसेच मा. श्री गोपाल बांदल यांची भोर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आझाद रिक्षा चालक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा श्री. शफिक भाई पटेल यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

   एका नामांकित कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून नोकरी करताना रिक्षा चालकांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे तसेच व्यवसायाबाबत मिळालेल्या अनुभवातून त्यांनी स्वतः नोकरी सोडल्यानंतर विविध अडचणींचा सामना केला आहे. याबाबत बोलताना पत्रकार अडागळे म्हणाले की मी स्वतः रिक्षा चालवली आहे व रिक्षा चालकांच्या समस्या व अडचणी चांगल्या प्रकारे जाणतो तसेच जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः व माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सहकारी यांच्या समवेत रिक्षा चालकांच्या तसेच इतर सामाजिक प्रश्नाबाबत प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी खात्री देतो.

    यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शफिक भाई पटेल, सहकारी मित्र महालिंग स्वामी तसेच संघटनेचे पदाधिकारी मुक्तार कोतवाल व सिम्मिनाज मुजावर आदि उपस्थित होते.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!