A2Z सभी खबर सभी जिले की

वाळूज हादरले… चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्धण हत्या!

छत्रपती संभाजीनगर (अशोक मुळे) : वाळूज येथील लांजी रोड परिसरातील रॉयल लॉन्सजवळ तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घूण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी (८ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. प्रथमेश प्रभाकर गायकवाड (वय २२, रा. मनीषनगर, वाळूज) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. वाळूज पोलीस मारेक्यांचा शोध घेण्यासाठी सर्वबाजूनी तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेन्यांचे फूटेज तपासले जात आहेत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, कंपनीतून कामावरून आल्यावर प्रथमेशने घरी जेवण केले. नंतर काही वेळात परत येतो, असे सांगून घराबाहेर पडला, रॉयल लॉन्सजवळ प्रथमेश रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याला नागरिकांनी लगेचच घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या छातीत चाकूचे वार आहेत. प्रथमेशची हत्या कुणी व का केली, याचा तपास पोलीस करत आहेत. लांजी रोड परिसरात मोठया प्रमाणावर हॉॉटेल्स आहेत. रात्रीच्या वेळीही गर्दी असते.

Back to top button
error: Content is protected !!