
संजय पारधी चंद्रपूर (महा)
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलोपमेंट यांच्या तर्फे योनेक्स सनराईज जी. एच. रायसोनी स्मृती प्रित्यर्थ विदर्भ लेव्हल बॅडमिंटन टूर्नामेंट २०२५ चे आयोजन १८ ते २१ डिसेंबर दरम्यान बॅडमिंटन हॉल , डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सिविल लाईन , चंद्रपूर येथे होणार आहे.
या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये ३० इव्हेंट्स होणार आहेत. ज्यामध्ये बॉईज सिंगल्स अंडर ९, गर्ल्स सिंगल्स अंडर ९, बॉईज सिंगल्स अंडर ११, गर्ल्स सिंगल्स अंडर ११,बॉईज सिंगल्स अंडर १३, गर्ल्स सिंगल्स अंडर १३, बॉईज डबल्स अंडर १३, गर्ल्स डबल्स अंडर १३, बॉईज सिंगल्स अंडर १५, गर्ल्स सिंगल्स अंडर १५, बॉईज सिंगल्स अंडर १७, गर्ल्स सिंगल्स अंडर १७, बॉईज डबल्स अंडर १७, गर्ल्स डबल्स अंडर १७, मेन्स सिंगल्स , वूमेन्स सिंगल्स , मेन्स डबल्स , वूमेन्स डबल्स , मिक्सड डबल्स , मेन्स सिंगल्स ३५+, वूमेन्स सिंगल्स ३५+, मेन्स डबल्स ३५+, वूमेन्स डबल्स ३५+, मिक्सड डबल्स ३५+, मेन्स सिंगल्स ४०+, मेन्स डबल्स ४०+, मेन्स सिंगल्स ५०+, मेन्स डबल्स ५० + , मेन्स सिंगल्स ६०+, मेन्स डबल्स ६०+ होणार आहेत. स्पर्धेत प्रवेश घ्यायची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. या स्पर्धेत विजयी खेळाडूंना दोन लाखांपर्यंतचे बक्षीस , मेडल्स तसेच प्रमाणपत्र मिळणार आहेत. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलोपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक यांनी चंद्रपूर मधील खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती करीता सचिव श्री. जोवेल चांदेकर (९८२२२०१७८५), श्री. आदित्य गलांडे (९५४५२०२८३३) , श्री. यथार्थ मेश्राम (७७०९८५४५४८) यांच्याशी संपर्क साधावा.




