*राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन व नवोन्मेष स्पर्धेची प्रथम निवड चाचणी जे. एम. पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात यशस्वी* विलास केजरकर भंडारा.
*राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन व नवोन्मेष स्पर्धेची प्रथम निवड चाचणी जे. एम. पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात यशस्वी* विलास केजरकर भंडारा.
प्रेस नोट
भंडारा
*राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन व नवोन्मेष स्पर्धेची प्रथम निवड चाचणी जे. एम. पटेल महाविद्यालयात मोठ्या उत्साहात यशस्वी*
विलास केजरकर भंडारा.
भंडारा: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित १८ व्या राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन व नवोन्मेष स्पर्धेची प्रथम निवड चाचणी फेरी भंडारा येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.
१८ व्या राज्यस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन व नवोन्मेष स्पर्धा कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर व कुलसचिव श्री. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार सेलचे अध्यक्ष डॉ. निर्भय संचेती व कार्यक्रमाध्यक्ष डॉ. संजय ढोबळे यांच्या समन्वयातून या उपक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अशोक लेलँड प्लांट प्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अविष्कार समन्वयक डॉ. प्रकाश इटणकर, विद्यार्थी विकास विभागाचे सचिव तथा अविष्कार संमेलन समन्वयक डॉ. विजय खंडाळ, नूतन कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलू तिडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती व नवोन्मेषाची आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, नव्या संशोधकांची ओळख घडवून आणणे तसेच त्यांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अविष्कार हे आयोजन संविधानाच्या मूल्यांना चालना देणारे असल्याचे नमूद केले. संशोधनामुळे विज्ञानाला गती मिळते. आणि समाजातील समस्यांवर उपाय सुचतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टर व मॉडेल्समधून त्यांची चिकित्सक बुद्धी व सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली आहे असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित अविष्कार समन्वयक डॉ. प्रकाश इटणकर यांनी कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा व कृतज्ञता या सात ‘क’ घटकांवर अवलंबून अविष्कारचे यश असते असे प्रतिपादन केले. तर उद्घाटक अशोक लेलँड प्लांट प्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी भविष्यातील पिढीला संशोधनाकडे कसे वळविता येईल यावर मार्गदर्शन केले. नूतन कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या नीलू तिडके यांनी कल्पकतेचे महत्त्व अधोरेखित करत युवकांच्या नवसंशोधनातून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडू शकते असा आशावाद व्यक्त केला. विद्यार्थी विकास विभागाचे सचिव तथा अविष्कार संमेलन समन्वयक डॉ. विजय खंडाळ यांनी भव्य आयोजनाबद्दल महाविद्यालय व प्राचार्यांचे अभिनंदन केले. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
या स्पर्धेत गोंदिया -भंडारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी ५५ विद्यार्थ्यांनी संशोधनाधिष्ठित पोस्टर्स तर २५ विद्यार्थ्यांनी कार्यानुभवाधारित वैज्ञानिक मॉडेल्स सादर केले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अविष्कार २०२५ च्या प्राथमिक फेरीला उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. तज्ज्ञ परीक्षकांनी नवोन्मेष, वैज्ञानिकता, सादरीकरण आणि भविष्यकालीन उपयुक्तता या निकषांवर मूल्यांकन केले. निवड झालेल्या विद्यार्थी पुढील विद्यापीठस्तरीय फेरीत सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. एम. पटेल महाविद्यालय कार्यक्रम समन्वयक डॉ. कार्तिक पन्नीकर व प्रा. भोजराज श्रीरामे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविष्कार समन्वयक डॉ. यशपाल राठोड यांनी केले. आयोजन यशस्वी करण्यासाठी डॉ. अपर्णा यादव, अविष्कार समन्वयक मंडळ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015






