
दिनांक :- 02/01/2026
————————————-
कात्रड ता. राहुरी येथे जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
————————–
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री गजाबापु नाथु दांगट वय- 85 वर्षे, रा.दांगटवस्ती, कात्रड, ता. राहुरी जि. अहिल्यानगर हे दिनांक 28/12/2025 रोजी रात्री 09/30 वा.चे सुमारास घरी कुटुंबासह झोपले असतांना चार अनोळखी आरोपीने कशाचे तरी सहाय्याने दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन धारदार हत्याराचा धाक दाखवुन बळजबरीने सोने चांदीचे दागिणे रोख रक्कम, मोबाईल काढुन घेवुन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण केले आहे. सदर घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1433/2025 बीएनएस कलम 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता.
मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/ हरिष भोये, पोउपनि/ महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, दिपक घाटकर, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, विशाल तनपुरे, भगवान थोरात, सागर ससाणे, रोहीत येमुल, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चालक महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देवुन फिर्यादीकडुन आरोपींचे वर्णन प्राप्त करुन गुन्ह्यातील आरोपींचा व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना, दिनांक 01/01/2026 रोजी माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रघुवीर विरुपन भोसले रा. घासगाव, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीगनर याने त्याचे साथीदारांसह केला असुन ते नेवासा फाटा परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर माहिती आधारे नेवासा फाटा येथे सापळा रचुन शिताफिने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) रघुवीर विरुपन भोसले, वय- 18 वर्षे रा. घासगाव, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीगनर, 2) दिनेश विरुपन भोसले, वय -23 वर्षे रा. घासगाव, ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. पथकाने आरोपी नामे रघुवीर विरुपन भोसले याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार 2) दिनेश विरुपन भोसले, 3) तिरंगा कडु उर्फ फादर काळे, 4) बदाम कडु उर्फ फादर काळे, 5) महेश नंदन उर्फ नंदु काळे, 6) आवकाश गोपीनाथ काळे रा. सर्व शिरोडी, ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांचेकडुन अहिल्यानगर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 राहुरी, जि. अहिल्यानगर 1433/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 309(6)
2 पाथर्डी, जि. अहिल्यानगर 1413/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 127(2),310(2)
3 शेवगाव, जि. अहिल्यानगर 1113/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 309(4),3(5)
4 शेवगाव, जि. अहिल्यानगर 1004/2025 बी.एन.एस. 2023 चे क. 309(6),3(5)
5 राहुरी, जि. अहिल्यानगर 1065/2024 बी.एन.एस. 2023 चे क. 310(2),311,331(6)
आरोपी नामे रघुवीर विरुपन भोसले याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये तो फरार आहे.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 एमआयडीसी , जि. अहिल्यानगर 447/2025 बी.एन.एस. क. 310(6)
2 बिडकीन, जि.छत्रपती संभाजीनगर 130/2025 बी.एन.एस. क. 310(6)
3 गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर 227/2025 बी.एन.एस. क. 310(6)
ताब्यातील आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन गु. र. नं. 1433/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6) प्रमाणे दाखल गुनह्याचे तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व मा. श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.




