ठाणे:-भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यासाठी 1 हजार 42 कोटी रुपये आणि माणकोली-अंजुरफाटा-चिंचोटी रस्त्यासाठी 332 कोटी रुपयांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली. या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेचे खासदार श्री. राजेंद्र गावित आमदार श्री. शांताराम मोरे, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रकाश निकम, कुणबी सेनेचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ पाटील, जिल्हाधिकारी श्री. गोविंद बोडके, श्री. भरत राजपूत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे , उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे सहकार्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतल्यामुळे या दोन्ही रस्त्यांचे काम होत आहे, याबद्दल सर्वांचे आभार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मानले. भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणामुळे लाखो ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्याचे काम दीड वर्षात पूर्ण होईल.