डोंबिवली शहरात व परिसरात मोठया प्रमाणात तरुण वर्ग हा सरकारने बंद केलेल्या चरस, गांज्या, आफिम, गर्दा,एम.डी.विषारी अमली पदर्थ्यांच्या नशेच्या आहारी जात आहे. शाळा कॉलेज मधील तरुण तरुणी यांची मोठी संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असतांना देखील हे अवैद्य रित्या विक्री करणार्यांवर पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची कारवाई करत नसल्याचे समोर आले असून, विक्री करणारे हे डोंबिवली शहरातील मोजक्या ठिकाणी हा नशेचा धंदा जोरात करत आहेत. डोंबिवली शहरातील कोपर रोड हा परिसर अमली पदार्थ विक्रीचे व नशेचे केंद्र बिंदू मानले जाते ह्या ठिकाणी गुन्हेगारी करणारे विषारी अमली पद्धार्थ विक्री करतात त्यांना स्थानिक पोलीस ठाणे यांचे आसरा असल्याचे पाहणीत समोर आले आहे. कचोरे गाव, शेलार चौक, जुनिडोंबिवली, सिद्धार्थ नगर, आश्या ठिकाणी विषारी अमली नशेची पदार्थांची विक्री मोठया प्रमाणात होते, हे सर्व विक्री करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असतानाही ते कायदा पायी तुडवून तरुण्णांना नशेची लत लावून त्यांचा फायदा करून घेत आहेत, डोंबिवली पश्चिम येथील वाशी बस स्थानक हा तर नशा करण्याचा नका समजला जातो, गस्त घालणारे पोलीस कर्मचारी हे नशा करणाऱ्यान जवळून १०००/५०० घेऊन सोडून देतात काही ठराविक गुन्हे दाखल करतात. डोंबिवली शहर नशा मुक्त करायचे असेल तर ज्या ठिकाणी तरुणांना नशेची अमली पदार्थ विकली जातात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचे धंदे पूर्णपणे बंद करावेत.
2,504 Less than a minute