ठाणे प्रतिनिधी:- बदलापूरचे झपाट्याने विकास होत असून या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र साखळी उपोषण करण्याची वेळ आली आहे पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समिती बदलापूरचे अध्यक्ष श्री शरद जयराम म्हात्रे यांनी साखळी उपोषणाचा पवित्र हाती घेतला आहे नगरपरिषद कार्यालयाच्या गेट समोर १४ मार्च २०२४ पासून त्यांच्यासह अनेक स्थानिक शेतकरी हे साखळी उपोषणाला बसले आहेत तसेच बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे
- महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या ३ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या महाभयंकर पुराचा दाखला देत बदलापूर परिसर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बदलापूर उल्हासनदीच्या पूर्व व पश्चिम भागात पूररेषा टाकल्यामुळे दोन्ही बाजूला असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीचे विकसित करण्यास मोठा अडथळा निर्माण झालेला आहे गेल्या अनेक वर्ष जुन्या इमारती उभे आहेत त्या विकसित तसेच नवीन इमारतींना परवानगी पुररेषा बाधित स्थानिक शेतकऱ्यांना व विकासकांना मिळत नसल्याने शहराच्या विकासामध्ये व रिडेव्हलपमेंट साठी अडथळा निर्माण झाला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या व विकासकांच्या जमिनीवर राज्य सरकार पूररेषा काढत नाही त्यासाठी पूररेषा संघर्ष समितीची शरद जयराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले
पुररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने सरकार समोर १)उल्हास नदीची लाल व निळी पुररेषा चुकीची आहे त्या दुरुस्ती कराव्यात २)विकास आराखड्यातील निवासी क्षेत्रावर निर्बंध पूर्णतःहा शिथिल करावेत ३)जुन्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासासाठी (TDR)मंजूर करावी अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकार समोर समितीने ठेवले आहेत
संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद बदलापूर ते कर्जत येथील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे जुन्या काळापासून नदीकाठी लोकवस्ती आहेत शेतजमिनी साठी पाणी लागत असल्यामुळे अनेक गावे ही नदीकाठी वसलेली आहेत अशातच कधीतरी मोठा पूर आला म्हणून त्या पुरेरेषेत टाकून तेथील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी असून त्यांना स्वतःच्या जमिनी वरती विकास करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करण्याचा निर्णय व राज्य सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी घेतलेला असून जोपर्यंत राज्य सरकार पुरेरेषेतून स्थानिक शेतकऱ्यांची सुटका करत नाही तोपर्यंत राज्य सरकारची सुटका आम्ही शेतकरी व आमची समिती होऊ देणार नाही