A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

पद्मश्री मुरलीकांत पेटकर(चंदू चॅम्पियन)यांच्या हस्ते पुण्यात "शिवप्रहार"ला छ.शंभुराजे पुरस्कार...

पद्मश्री मुरलीकांत पेटकर(चंदू चॅम्पियन)यांच्या हस्ते पुण्यात "शिवप्रहार"ला छ.शंभुराजे पुरस्कार...

प्रेस नोट
गांधी भवन,कोथरूड
पुणे

पद्मश्री मुरलीकांत पेटकर(चंदू चॅम्पियन)यांच्या हस्ते पुण्यात “शिवप्रहार”ला छ.शंभुराजे पुरस्कार…

पुणे(शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,युगप्रवर्तक,युगपुरुष,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरापगड शिवहिंदुत्व विचारांवर श्रीरामपूर येथुन राज्यभर कार्य करणारी बिगरराजकीय संघटना “शिवप्रहार प्रतिष्ठान” या संघटनेला गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या वतीने मानाचा “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मभूषण शौर्य पुरस्कार” पुण्यातील कोथरूड गांधी भवन येथे प्रदान करण्यात आला.चंदू चॅम्पियन या हिंदी चित्रपटाचे ओरिजनल नायक,अर्जुन पुरस्कार विजेते,पद्मश्री श्री.मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात शिवप्रहारला हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी पद्मश्री श्री.पेटकर सर यांच्या हस्ते शिवप्रहारप्रमुख,माजी PSI श्री. सुरजभाई आगे यांनी हा पुरस्कार शिवप्रहारच्या सर्व पदाधिकारी,मावळ्यांच्या वतीने स्वीकारला.
गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट,पुणे या संस्थेचे प्रमुख तथा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज श्री.कुणालजी मालुसरे,धाराऊ मातेचे वंशज श्री.अमितजी गाडे,सरदार हैबतराव शिळीमकर यांचे वंशज मंगेशजी शिळीमकर यांच्यासह विविध सरदार घराणे कंक,बांदल,इंगळे,घोरपडे,जाधव यांचे वंशज कार्यक्रमाला उपस्थित होते.छ.संभाजीनगर नामकरण मोहीम,लेकीबाळींच्या रक्षणासाठी भवानी रक्षा मोहिम,तसेच श्रीरामपुरात शिवस्मारकसह श्रीरामपूर जिल्हा मोहीम आणि इतरही गाय-माय रक्षणाचे कार्य, शेतकरी-कष्टकऱ्यांसाठीचा लढा, आंदोलनं,मोर्चे असे शिवप्रहारचे सर्व शिवकार्य याची दखल म्हणून शिवप्रहार संघटनेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!