

समीर वानखेडे ब्युरो चीफ:
चंद्रपूर जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून रब्बी हंगाम 2025-26 मधील मका खरेदीचे उद्दिष्ट 1 लाख क्विंटलपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. शासनाने निश्चित केलेले केवळ 5 हजार क्विंटलचे उद्दिष्ट उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत अपुरे असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
1.62 लाख क्विंटल उत्पादनाचा अंदाज, उद्दिष्ट मात्र 5 हजार
आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले की, यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात 2022 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यात सुमारे 1 लाख 62 हजार 838 क्विंटल मका उत्पादनाचा अंदाज आहे. मात्र शासनाने खरेदीसाठी केवळ 5 हजार क्विंटलचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे अत्यंत कमी आहे.
खासगी व्यापाऱ्यांकडून फसवणुकीची भीती
“सध्याचे उद्दिष्ट कायम राहिल्यास अनेक शेतकऱ्यांना त्यांचा मका खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागेल आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागेल,” अशी चिंता आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पोंभूर्णा येथे खरेदी केंद्र सुरू, आता उद्दिष्ट वाढीचा पाठपुरावा
शेतकरी हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे नुकतेच पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू झाले आहे. आता अपुऱ्या उद्दिष्टाचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे पुढे आणला आहे. केवळ भूमिका मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील मका उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आह





