ठाणे प्रतिनिधी :- बारटक्के फाउंडेशन हे ठाण्यामध्ये नेहमीच विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतात तसेच जागतिक महिला दिनानिमित्त स्री शक्ती सन्मान २०२४ हा कार्यक्रम १० मार्चला ठाण्यामध्ये आयोजन केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिवसेना महिला आघाडी,युवती सेना,बारटक्के फाउंडेशन,यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका समाज कल्याण,समाज विकास उप-आयुक्त वर्षा दिक्षित यांच्या प्रमुख हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या जीवनातील कौटुंबिक कर्तव्य करत स्वतःच्या अंगभूत कला व मेहनतीने उद्योग,नोकरी हे कर्म करत, कर्तुत्ववान असलेल्या महिलांचा सत्कार होणार आहे
महिला सत्कार मूर्ती, ज्योती साजूरकर(सासू सुधा,सून), रक्षा हळदणकर (आदर्श शिक्षक),स्नेहा लोकरे (जलतरणपटू), तेजश्री सावंत (नृत्यांगना) शिबा पंगथ (आईस्क्रीम उद्योजिका) कंचन केसवणी (फ्रुटक्राफ्टस उद्योजीका) भूमिका केरसकर (जेवण डबेवाले उद्योजीका) योगिता अत्रे (योग शिक्षिका) यांचा रविवारी १० मार्चला घरोघरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे