ठाणे प्रतिनिधी:- भिवंडी लोकसभा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेस पक्षानेच लढत आलेला असून भिवंडी लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने दावा केल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षालाच मिळावा यासाठी पक्षाचे पदाधिकारी यांचा आटापिटा सुरू झाला आहे या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी दयानंद चोरघे यांनी दिल्लीकडे कुच केली असून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याचे समजते
या मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार सहा वेळा विजयी झालेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असावा आशी भूमिका घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली भिवंडी लोकसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व व पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला हजारो मताने मताधिक्य मिळत आले असल्याने पारंपारिक काँग्रेस पक्षाचे मतदारांच्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर इतर पक्षांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी व्यक्त केला आहे