बदलापूर :- पादचाऱ्यांचा रस्त्यांवर अग्रहक्क असतो असं म्हणतात पण हल्ली रस्ते पादचाऱ्यांसाठी राहिले नाहीतच पण त्यांच्या हक्काचे फूटपाथही त्यांचे राहिलेले नाही बदलापूरमध्ये तर सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरील फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, नागरिक, फेरीवाले, पोलिस या सगळ्यांच्याच एकत्रित सहभागातून फूटपाथमुक्त होऊ शकतात आणि चालणाऱ्यांना हक्काची वाट मिळू शकते. फूटपाथ आपल्यासाठी खरंच असतात का असा बदलापूरकराना कायम प्रश्न पडतो. अतिक्रमण, भिकारी, कचरा, फूटपाथकडे दुर्लक्ष याबद्दलच्या समस्यांना बदलापुरात विविध ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागते
फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे फेरीवाले फुटपाथवर बसतात. व जो फूटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य आणि बोर्ड मांडून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. विशेष करुन महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वादही होतात. असाच प्रकार बदलापूर स्टेशन रोडच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर दिसून येतो
बदलापूर स्टेशनरोड हा रहदारीसाठी मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी पूर्ण फुटपाथची जागा आपल्या व्यवसायासाठी वापरत आहेत त्यामुळे फुटपाथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते नक्की फुटपाथ हे व्यवसाय करण्यासाठी आहेत की नागरिकांना चालण्यासाठी आहेत हाच प्रश्न बदलापूरकराना आजुन पर्यंत समजू शकले नाही या साऱ्या अतिक्रमणामुळे नागरिकांनी कुठून चालावे हे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे तसेच बदलापूर नगरपरिषदेचे अधिकारी या दुकानदारांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही स्थानिक कार्यकर्ते व राजकीय नेते यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेला दिसून येतो कधी फुटपाथ मोकळा श्वास घेतील व नागरिकांना आपल्या हक्काच्या फुटपाथवर चालता येणार आहे
मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा असणे हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे पण बदलापूर मध्ये फुटपाथ हे शिल्लक राहिलेच नाही त्यामुळे बदलापूर नगरपरिषदेने या गोष्टीवर योग्य तो विचार करून फूटपाथ अडवणूक करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी तरच बदलापूरकरांना मोकळे फुटपाथ मिळू शकते। सिद्धेश विचारे- बदलापूर स्थानिक रहिवासी