पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार
पुण्याच्या बाहेरील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या सोबत असलेल्या पुरुष मित्रावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री 11 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा पुरुष मित्र उशिरा बोपदेव परिसरात गेले असताना तीन अज्ञात आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.