
संजय पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र
वरोरा : दिनांक 9 व 10 ऑक्टोबर 2024 रोजी आनंदवन वरोरा येथे पार पडलेल्या शालेय विभागीय योगासन स्पर्धे मधून SA Yoga Institute च्या एकूण 4 योगपट्टूनची स्वबळावर कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रथमतः नागपूर विभागातील वर्धा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा या विशेष जिल्ह्यातील खेळाडूंना मागे टाकत लातूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय योगासन संघामध्ये मुलांमध्ये राम झाडे, रुद्राक्ष डांगरे, साहिल खापणे, व मुलींमध्ये सई नेवास्कर यांनी आपले स्थान निश्चित केले आहे.
सर्व विजेते योगपट्टू मागील 5 वर्षांपासून SA Yoga Institute चे संस्थापक स्वप्नील पोहनकर व अनिकेत ठक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहे . विजेत्यांनि त्याचे सर्व श्रेय त्यांच्या योगशिक्षक तथा पालकांना दिले आहे. सर्व पालक व त्यांचे योगशिक्षक यांनी विजेत्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.