

समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र:
अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर देवग्राम येथे अंत्योदय मिशन देवग्राम संस्थेचे संस्थापक गुरुवर्य दर भाऊसाहेब भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी जयंती साजरी करण्यात आली .
प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक दवाखान्याचे अधीक्षक डॉ किशोर तरार , मार्गदर्शक डॉ आशिष काटे , सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ संजय सोलंकी , अंत्योदय मिशन संस्थेचे संचालक आणि अंत्योदय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते .
संस्थेचे संस्थापक गुरुवर्य डॉ भाऊसाहेब भोगे यांनी गरीब गरजू लोकांसाठी देवग्राम येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू केला आहे . प्रमुख पाहुणे डॉ किशोर तरार यांनी हॉस्पिटल मधे देण्यात येणाऱ्या सुविधा जसे रक्त तपासणी पंचकर्म व इतर सेवा स्वस्त दरात उपलब्ध असल्याची माहिती दिली. डॉ आशिष काटे यांनी विद्यार्थ्यांना धन्वंतरी जयंती विषयी माहिती दिली .कार्यक्रमाला अमित पांगुळ, आदित्य वाडबुढे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले


