
संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र
चंद्रपुर : भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण jविभागाच्या संचालिका प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांना ४५ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा २०२४, नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्राध्यापिका संगीता आर.बांबोडे, यांनी *चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ५००० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रजत पदक प्राप्त करून चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याच्या पदक तालिकेत ३ पदकांची भर घातली.* यासोबतच प्राध्यापिका संगीता आर बांबोडे यांची निवड *आंतरराष्ट्रीय साउथ एशियन मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा २०२५ करिता करण्यात आली.* ही स्पर्धा १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान मॅगूलर कर्नाटका येथे आयोजित करण्यात येत आहे. भद्रावती शहरातील महिला प्रथमच ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे, महाराष्ट्र राज्याचे, चंद्रपूर जिल्ह्याचे आणि भद्रावती शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय आई वडील, संघमित्रा बांबोडे, संघपाल बांबोडे, संध्या दुधे, गुरुवर्य प्रा. रसिकलाल वारकरी, डॉ. अनिलकुमार करवंदे, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे मा.श्री. पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष, जयंतभाऊ टेमुर्डे सचिव, अमनभाऊ टेमुर्डे आणि विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे सर्व पदाधिकारी, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, विवेकानंद महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचारी, चंद्रपूर जिल्हा मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष मारोती उरकुडे, सचिव, सुरेश तुमे, चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष, डॉ. दिलीप जैस्वाल, सचिव सुरेश अडपेवार आणि चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सर्व पदाधिकारी, वर्षा कोयचाडे, पूर्वा केरकर, डॉ. बी. प्रेमचंद, डॉ. माला प्रेमचंद, डॉ. आनंद निते, डॉ. दिलीप बगडे, डॉ. राकेश तिवारी, विजय लांबट, दिलीप मोडक, लता इंदुरकर, सुनीताताई तोडसाम, पायल तोडसाम, गीता मानगुडदे, श्रुती कामतवार, साक्षी मशाखेत्री आणि मित्रपरिवार यांना दिले. आणि पुढील होणाऱ्या साऊथ एशियन मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धा २०२५ करिता, सर्वांनी शुभेच्छा दिल्या.