A2Z सभी खबर सभी जिले की

खर्डा येथे टेम्पोच्या चाकाखाली चिरडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू….खर्डा परिसरात हळहळ व्यक्त

खर्डा येथे टेम्पोच्या चाकाखाली चिरडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू….खर्डा परिसरात हळहळ व्यक्त

प्रतिनिधी अहिल्यानगर:- राविराज शिंदे

घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या परी लखन गायकवाड रा .खर्डा या तीन वर्षीय चिमुकलीस पाण्याच्‍या टेम्पोने धडक दिल्याने तिचा टेम्पोच्या खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही हळहळ करणारी घटना जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दि 25 जानेवारी रोजी दुपारी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे गल्ली जवळ परी लखन गायकवाड ही तीन वर्षाची चिमुकली रस्त्याच्या बाजूला खेळत होती यावेळी अचानक खर्डा बस स्थानका कडून सुर्वे गल्लीकडे रत्नसुरेश कॉम्प्लेक्सच्या खालच्या रस्त्याने वरील रस्त्याकडे पाण्याचा टॉम्पो जात असताना सदर चिमुकलीस धडक दिली व ही चिमुकली या टेम्पोच्या चाकाखाली चिरडली गेली यामुळे तिचा या घटनेत तातडीने जागेवरच मृत्यू झाला. ही घटना आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर अपघाता स्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत टेम्पो चालक हा त्या ठिकाणावरून फरार झाला होता.

सदरचा टॅम्पो खर्डा शहरात पाणी वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत खर्डा पोलीस अधिक तपास करीत आहेत. यानंतर सदर मुलीस डॉक्टर बिपिन लाड यांनी आपल्या ॲम्बुलन्स मधून जामखेड ग्रामीण हा रुग्णालयात आणले होते मात्र पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.यानंतर सायंकाळी चार ते पाच वाजता मयत मुलीचे जामखेड ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत परी हीचे वडील लखन गायकवाड यांचे मुळ गाव तेलंगशी आसुन खर्डा येथे त्यांचे सलूनचे दुकान व सुमन कम्प्युटर्स इन्स्टिट्यूट आहे. चिमुकलीच्या मृत्यूने खर्डा व परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!