
राहूरी : शहाजी दिघे
राहूरी : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील जि. प. प्राथमिक शाळा दिघेवस्ती या आदर्श व उपक्रमशील शाळेने अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत दोन बक्षिसे पटकावत यशाची परंपरा कायम राखली आहे .
किलबिल गटात वक्तृत्व स्पर्धेत सार्थकी संतोष पाटोळे हिने जिल्ह्यात तृतीय क्रमांक, बालगटात वक्तृत्व स्पर्धेत श्रेया शंकरराव हजारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत किलबिल गटात संचित अजित शिंदे याने उत्कृष्ट सादरीकरण केले .यापूर्वी शाळेने तालुका पातळीवर पार पडलेल्या स्पर्धेत
प्रथम क्रमांकाची तीन व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत लहान गटात दैवत छत्रपती या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून द्वितीय क्रमांक मिळवला .
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे, उपशिक्षक -राजेंद्र बोकंद, विद्याताई उदावंत, सुनिता ताजणे, मनिषा शिंदे, सोमनाथ अनाप व श्रीम. सरगम मोटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ ,पालक, ग्रामस्थ तसेच गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती धट, केंद्रप्रमुख सौ. सरस्वती खराडे यांनी शाळेचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.