पारनेर : पारनेर तालुक्यातील ग्रामिण भागातील जि.प.च्या धोत्रे खुर्द शाळेतील तिसरी वर्गातील विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने नुकत्याच पारनेर येथे झालेल्या तातुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. मुलांमधे हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी,सुवाच्च सुंदर वळणदार अक्षरांचे उद्दीष्ठ ठेवून अहमदनगर जिल्हा परिषद दरवर्षी विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धाहा उपक्रम आयोजीत करत असते.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत पारनेर तालुक्यातील धोत्रे खुर्द जिल्हा परिषदेच्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी विराज सुभाष सासवडे याने बालगटात प्रथम क्रमांक पटकवला. त्याला वर्गशिक्षक सचिन ठाणगे व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पारनेर तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर , शिक्षणाधिकारी भास्कर पाटील,गटशिक्षणाधिकारी सिमाताई राणे ,विस्तार अधिकारी कांतिलाल ढवळे, केंद्रप्रमुख यादव येवले व ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले.