
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या निधीतून एकूण २३ शाळांच्या प्रत्येकी दोन वर्ग खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.
विविध शाळांच्या वर्गखोल्यांची दुरावस्था झाल्यामुळे खा. नीलेश लंके यांच्याकडे दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आल्यांनतर खा. लंके यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित शाळा खोल्या दुरूस्तीसाठी निधी मंजुर करण्याच्या सुचना दिल्या होत्या
त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास पत्र देत संबंधित निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला. प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी संबंधित वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीस प्रशासकीय मान्यतेचे पत्र दिले.
प्रत्येकी दोन वर्ग खोल्या दुरूस्तीसाठी मंजुर करण्यात आलेला निधी व शाळा पुढील प्रमाणे : चोंभूत ३ लाख, बाबुर्डी २ लाख, अस्तगांव १ लाख ७५ हजार, रायतळे २ लाख, मुंगशी २ लाख, जातेगांव १ लाख ५० हजार, राळेगणसिध्दी २ लाख ८० हजार, यादववाडी तरडेमळा १ लाख ९० हजार,
मावळेवाडी २ लाख, पळवे खुर्द २ लाख ३० हजार, भाळवणी, हनुमानवाडी दहावा मैल २ लाख १० हजार, भाळवणी नागबेंदवाडी १लाख ९० हजार, टाकळीढोकेश्वर ढोकेश्वर वस्ती २ लाख, तिखोल संरक्षक भिंत दुरूस्ती १ लाख ९० हजार, मांडवेखुर्द खडकवाडी १ लाख ९५ हजार,
म्हसोबा झाप शिंदेवाडी फाटा २ लाख, म्हसोबा झाप भोसरमळा २ लाख, म्हसोबा झाप बीबीचा मळा १ लाख ९० हजार, म्हसोबा झाप गाढवे मळा १ लाख ७० हजार, म्हसोबा झाप भोरवाडी २ लाख. हिवरेझरे ता. नगर २ लाख ९९ हजार ९९९, गुंडेगांव कुतळमळा ता. नगर ३ लाख ३० हजार, बाबुर्डी घुमट २ लाख ९९ हजार ९९९.
नव्या वर्गखोल्यांसाठी २ कोटी ४० लाख
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या जिर्ण झाल्याने त्या ठिकाणी नव्या खोल्या बांधण्यासाठी यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाकडून २ कोटी ४० लाख रूपयांचा निधी खा. लंके यांनी मंजुर करून घेतला होता. या निधीतून २० वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.