


पुणे: नवले ब्रिज प्रमाणेच जुना कात्रज सातारा रस्त्यावर सुद्धा होतात वारंवार अपघात. कात्रज पासून कात्रज घाटापर्यंत प्रामुख्याने चार मोठे स्टॉप, शाळा, बस डेपो व दोन मोठी गावे मांगडेवाडी, भिलारवाडी असून या ठिकाणी स्पीड कंट्रोलची प्रणाली ही अतिशय साध्या स्वरूपातली असून एकही स्पीड ब्रेकर नसल्याचे दिसून आले त्यामुळे दुहेरी वाहतूक करणाऱ्या या रस्त्यावर वाहने सुसाट चालताना पाहायला मिळतात. 25 जुन रोजी दुपारी 04:00 दरम्यान मांगडेवाडी येथे माऊली हॉटेल समोर कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या एका पुणे महानगरपालिका सेवेत असलेल्या MH 42 B 3099 या टेम्पोला कात्रज कडून भिलारवाडी कडे जाणाऱ्या भरधाव MH 12 TN 9964 या कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहिती मध्ये कार चालकाचे नियंत्रण चुकल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. यामध्ये टेम्पोचे तसेच कारचे व एका दुचाकीचे MH 12 JL 133 मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून टेम्पो व कार मधील व्यक्तींना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तसेच पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे. या अपघाताने बराच वेळ कात्रज सातारा रस्त्यावरील ट्राफिक ठप्प झाले होते. अशा या बेसिस्त चालकांवर पोलिसांकडून काय कारवाई केले जाते असा प्रश्न स्थानिक नागरिकांनकडून विचारण्यात आला आहे. तसेच या रस्त्यावरील बस डेपो, शाळा व गावांच्या स्टॉप जवळ स्पीड ब्रेकर उभारून स्पीड कंट्रोल करण्यासाठी उपाय योजना प्रशासनाकडून करण्यात याव्या अशीही मागणी करण्यात येत आहे.