A2Z सभी खबर सभी जिले कीपुणेमहाराष्ट्र

कात्रज गुजरवाडी फाटा येथे रिक्षा, टेम्पो, दुचाकीचा भीषण अपघात

IMG 20250723 121745 scaled

IMG 20250723 121637 scaled

IMG 20250723 121545 scaled

 

 

 

 

 

 

IMG 20250723 121517 scaled

कात्रज पुणे: 

  आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 दरम्यान गुजरवाडी फाटा जवळील कात्रज सातारा रस्त्यावर टेम्पो, रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला. अपघाताचे स्वरूप इतके मोठे होते की रिक्षा व दुचाकीचे खूप मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये रिक्षाचालक दुचाकीचास्वार व टेम्पो चालक जखमी झाले असून कुठली जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

       याच कात्रज सातारा रस्त्यावर वारंवार असे अपघात झाले असून अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले आहेत. यापुढे असे निष्पाप लोकांचे प्राण जाऊ नये व असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून कुठलीही नियमावली व सुरक्षासाठी उपाययोजना याकरिता दखल घेतली जात नाही. या रस्त्यावर कात्रज, मांगडेवाडी, भिलारवाडी अशी मोठी गावे असून लोक वस्ती मोठ्या प्रमाणात आहे या रस्त्यावर वाहनांची आवक जावक मोठ्या प्रमाणात असते व शाळा, पी एम पी एल चा बस डेपो असून सुद्धा एकही गतिरोधक नसल्याचे आढळून आले आहे. याविषयी संबंधित पोलीस ट्राफिक विभाग डी वाय एस पी जाधव साहेब व भारती विद्यापीठ ट्राफिक विभाग एपीआय बडदे साहेब तसेच पुणे महानगरपालिका पथ विभाग कुणाल यादव साहेब यांना माहिती देण्यात आली असून तात्काळ याची दखल घेऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच याच कात्रज सातारा रस्त्यावर मोठ्या अवजड वाहनांचे गॅरेज असून मोठमोठी अवजड वाहने रस्त्यालगतच उलट सुलट स्वरूपात पार्क केली जातात यावर नियंत्रण आणून गुजरवाडी फाटा चौक या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना तात्काळ कराव्यात अशी स्थानिकानकडून मागणी करण्यात येत आहे.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!