वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चिंचोली खुर्द : आज दिनांक 14ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्रदिनानिमित्ताने ग्रामपंचायत चिंचोली खुर्द येथे आमसभा घेण्यात आली. या आमसभेत गावपातळीवर अनेक प्रकारचे गावाच्या विकासाबाबत ठराव पारित करण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने WCL प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर पूर्वी आर आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदान हे आजच्या काळात फारच कमी आहे. वाढती महागाई मुळे 2012 च्या आर आर पॉलिसी नुसार प्रति एकर आठ लाख रुपये मोबदला हा फारच कमी असल्याने त्यात केंद्र शासनाने वाढ करून तो प्रति एकर 30 लाख रुपये देण्यात यावा. अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी WCL कंपनी कडे केली.
आज या आमसभेत गावपातळीवर अशाप्रकारचा ठराव मंजूर करून तो पारित करण्यात आला.
या ग्रामपंचायत ठरावाचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले.