A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*भंडारा नगर परिषदेच्या दोन जागांसाठी २० डिसेंबरला निवडणूक होणार*!

*भंडारा नगर परिषदेच्या दोन जागांसाठी २० डिसेंबरला निवडणूक होणार*!

प्रेस नोट
भंडारा

*भंडारा नगर परिषदेच्या दोन जागांसाठी २० डिसेंबरला निवडणूक होणार*!

*प्रभाग १२ ‘अ’ व १५ ‘अ’साठी निवडणूक वेळापत्रक*

*विलास केजरकर भंडारा*.

*भंडारा* : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने भंडारा नगर परिषदेच्या २ जागांसाठी शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ ला निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांनी बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५ ला सुधारित निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.
प्राप्त माहितीनुसार, भंडारा नगर परिषद क्षेत्रातील दोन प्रभागांतील दोन जागांसाठी निवडणुका होत आहेत. यात प्रभाग क्रमांक १२ (अ) आणि प्रभाग क्रमांक १५ (अ) येथे निवडणुका नगर परिषद निवडणूक कायदा, १९६६ च्या नियम १७ (१) (ब) अंतर्गत कार्यवाहीच्या अपुऱ्या कार्यवाहीमुळे आणि उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाने मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ च्या निर्णयानंतर नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी रविवार २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या निर्णयानुसार सुधारित निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले.

*नव्या उमेदवारांना संधी नाही*

नव्या वेळापत्रकाप्रमाणे निवडणुका होणार असल्या तरी या दोन्ही ठिकाणी कुणालाही नामांकन मात्र नव्याने दाखल करता येणार नाही. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ज्यांचे नामांकन छाननीमध्ये कायम राहिले होते. त्यांचाच यात उमेदवार म्हणून अंतर्भाव असणार आहे. भंडाऱ्यातील प्रभाग १२ ‘अ’मध्ये असणारे ४ आणि प्रभाग १५ ‘अ’मध्ये असणारे ३ उमेदवारच या प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नव्याने नामांकन भरू पाहणाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.

*असा आहे निवडणूक कार्यक्रम*

🔸 *नामांकन परत घेण्याची मुदत- १० डिसेंबर २०२५, दुपारी ३ वाजेपर्यंत*
🔸 *चिन्हे वाटप आणि अंतिम यादी -११ डिसेंबर २०२५*
🔸 *मतदान – शनिवार २० डिसेंबर २०२५*
🔸 *मतमोजणी आणि निकाल -२१ डिसेंबर २०२५*

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Show More
Back to top button
error: Content is protected !!