प्रेस नोट
भंडारा
भंडारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकला भोपे
स्वीकृत सदस चैतन्य उमाळकर, सचिन कुंभलकर,ॲड. कैलास भुरे सह विनयमोहन पशिने यांची वर्णी
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- नगर परिषदेच्या शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ ला पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगर सेविका तथा भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष चंद्रकला भोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भंडारा नगर परिषद भाजपा गटनेते आशिष गोंडाने यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे स्वीकृत सदस्य म्हणून भाजपचे चैतन्य उमाळकर, सचिन कुंभलकर, अॅड. कैलाश भुरे यांची बिनविरोध निवड केली. तसेच शिवसेनेच्या गटातून ॲड. विनयमोहन पशिने यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भंडारा नगराध्यक्षा मधुरा मदनकर व मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले उपस्थित होते. यावेळी नगर परिषदेच्या आवारात मोठी गर्दी होती. विजयानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधी चौकात फटाके फोडले आणि गुलाल उधळला गेला.
यादरम्यान शासकीय विश्राम भवनात माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015



