वंचित बहुजन आघाड़ी चे अध्यक्ष प्रकाश अंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका अशा सूचना वंचित बहुजन आघाडीने कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये,” असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत करण्यात आलं आहे.
2,509 Less than a minute