A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

मोन्टफोर्ट शाळा बामणी, येथे शाळा वाहतूक समिती व तंबाखू मुक्त शाळा सभा संपन्न.

WhatsApp Image 2024 08 08 at 16.49.40

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर : मोन्टफोर्ट शाळा बामणी येथे शाळा वाहतूक समिती च्या संदर्भात शाळेत येणाऱ्या चालक-मालक यांची सभा तसेच तंबाखू मुक्त शाळा अभियान यांची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पर्यावरनाला अनुसरून शाळा वाहतूक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाल मोहुर्ले, उपाध्यक्ष शेख हमीद, सचिव बालाजी गट्टे, सहसचिव आकाश करमंकर,यांना रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर सभेत महाराष्ट्र शासनाचे सुचविण्यात आलेल्या सर्व नियमाचे पालन करणे बंधनकारक असून याची आपण सर्वांनी दखल घेत त्यांनी दिलेल्या सूचनाचे पालन करावे अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर प्रेमकुमार, शाळेचे समन्वयक प्रकाशराव, स्कूल ट्रान्सपोर्ट समिती संयोजक किशोर मोहुर्ले,सहसंयोजक घनश्याम बुरटकर, दयानंद एरा,हर्षल गाजरलावार, रोहिणी वालोकर यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. सभेत शाळेचे विद्यार्थी व शाळा वाहतूक चालक-मालक मनीष सातारकर, उमेश नवघरे, नंदकिशोर जीवतोडे,महादेव लेंनगुरे, सुरेश सातपुते,संतोष लोनगाडगे, सुनील उमरे,विजय पोतरलावार, आकाश पारखी, भीमराव नगराळे,आदी उपस्थित होते

Back to top button
error: Content is protected !!