A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

संजय पारधी बल्लारपूर

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यनिमित्ताने सकाळी 8:15 मिनिटांनी राष्ट्रध्वजारोहन महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष राजेशजी चिताडे व सन्माननीय नंदारामजी यांची उपस्थिती होती तत्पूर्वी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या 108 कॅडेट द्वारे पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीतांनंतर महाराष्ट्र गीत, एनसीसी द्वारे राष्ट्र एकात्मितेची भावना जागृतीच्या दृष्टीने एनसीसी गीत व देशाप्रति कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेण्यात आली प्रा. दिवाकर मोहितकर यांच्या मार्गदर्शनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी एनसीसी विभागातून अग्निवीर तसेच महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. बादलशाह चव्हाण सर म्हणालेत की ” देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक देशभक्तांनी त्याग केला या देशाला समृद्ध अशी शिक्षणाची परंपरा लाभली तत्कालीन परिस्थितीत या देशात नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला अशी विद्यापीठ ज्ञानदानाच कार्य करीत होती. त्यांनी शिक्षणासोबत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी शिक्षणाचा प्रसार केला. खऱ्या अर्थाने या देशाचा विद्यार्थीच देशाचं वर्तमानासह भविष्य घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात असे मत व्यक्त केले.” भारतीय स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ” एक पेड मा के नाम ” अंतर्गत मा. संजयभाऊ कायरकर, राजेश जी चिताडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!