A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालयात जागतिक योग दिवस साजरा

संजय पारधी चंद्रपूर

भद्रावती : विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस दिनांक २१ जून, २०२५ रोज शनिवार ला सकाळी ६.०० वाजता साजरा करण्यात आला. दिनांक १६ जून ते दिनांक २१ जून २०२५ पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाद्वारे “करे योग, रहे निरोग” या घोषवाक्यानुसार महाविद्यालयात ‘योग शिबिर सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले.
सदर योग शिबिराचे उद्घाटन दिनांक १६ जून, २०२५ ला करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (काॅंव्हेंट) वरोराचे अध्यक्ष मा. पुरुषोत्तमजी स्वान तर प्रमुख मार्गदर्शक/प्रशिक्षक म्हणून सौ. सरिता सातपुते व सौ. कानोपात्रा कवाडे, चंद्रकांत श्रीरामे पतंजली योग प्रशिक्षण समिती , भद्रावती चे प्रशिक्षक उपस्थित होते. माननीय प्रशिक्षकांनी योगसाध्येचे महत्त्व विशद करून मानवी जीवनातील योगाचे स्थान स्पष्ट केले व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना योग साधणेचे प्रशिक्षण दिले. तर अध्यक्षीय विचार मांडताना मा. अध्यक्ष पुरुषोत्तमजी स्वान यांनी योगाचे घोषवाक्यच ‘करे योग, रहे निरोग’ हे आहे. यावरून मानवी जीवनाच्या आध्यात्मिक, शारीरिक व बौद्धिक प्रगतीकरिता योग अमूल्य योगदान देतात, त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगसाधना करण्याचे आव्हान केले. या सप्तांतर्गत दिनांक १६ जून, ते २१ जून, २०२५ पर्यंत दररोज सकाळी 6.00 ते 7.00 वाजेपर्यंत विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना योग प्रशिक्षकांनी आणि प्रा. संगीता बांबोडे यांनी प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थी, नागरिक व शिक्षकांनी घेतला. तर २१ जून, २०२५ ला जागतिक योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पुरुषोत्तमजी स्वान, अध्यक्ष, विवेकानंद ज्ञानपीठ (काॅंव्हेंट) वरोरा होते. तर प्रशिक्षक म्हणून सौ. कानोपात्रा कावडे आणि प्रा. संगीता बांबोडे उपस्थित होत्या, तसेच ध्यानाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रभाकरन, टी. एम. व मा. विरास्वामी, प्रशिक्षक, मेडिटेशन सेंटर, डिफेन्स, भद्रावती उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशिक्षकांनी योगाचे प्रशिक्षण दिले तर विरास्वामी यांनी ध्यान साधनेचे महत्त्व व त्याची मानवी जीवनातील उपयुक्तता विशद करून उपस्थितांना ध्यान साधनेचे प्रशिक्षण दिले. अध्यक्ष म्हणून विचार मांडताना मा. पुरुषोत्तमजी स्वान साहेबांनी, नियमित योग हा मानवाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यासाठी जेवढा उपयुक्त आहे तेवढेच ध्यानाचेही महत्त्व आहे. म्हणून रोज सकाळी योग व ध्यान साधना करावी आणि ते सामूहिक झाले तर त्याचे परिणाम अधिक प्रभावी ठरतात. म्हणून आपल्या सर्वांना सामूहिक योग व ध्यान साधना करता यावी याकरिता महाविद्यालयाचे प्रांगण सजातील नागरिकांकरिता खुले करण्यात आले आणि योग व ध्यान ही प्रक्रिया दररोज सुरू करण्यात आली आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊ योग व ध्यान साधना आपल्या जीवनात अंगीकारून नियमित करावी‌ अशे उपस्थितांना आव्हान केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापिका संगीता बांबोडे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी केले, संचालन प्रा. जयवंत काकडे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख यांनी तर या कार्यक्रमाचे आभार प्रा. गजानन खामनकर यांनी व्यक्त केले. चहापान घेण्यात येऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!