A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

भंडारा जिल्हा होणार विकासाचा महामेरू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार! विलास केजरकर भंडारा.

भंडारा जिल्हा होणार विकासाचा महामेरू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार! विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
भंडारा

भंडारा जिल्हा होणार विकासाचा महामेरू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार!
विलास केजरकर भंडारा.

भंडारा : जिल्ह्यातील विविध विकास कामाचा नियोजनात्मक आराखडा तयार करून झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात विकासाच्या महामेरू निर्माण होणार असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याकरिता भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांना आपण निवडून देऊन शहराच्या विकासाचे हात मजबूत करावे अशी साद त्यांनी शहरातील जनतेला घातली आहे.
ते भंडारा जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीची प्रचार सभा शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दसरा मैदान येथे मार्गदर्शन करतांना बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या व प्रकर्षाने मागासलेल्या शहरांचा विकास कशा पद्धतीने आपण करणार आहोत याची ईत्तमभूत माहिती भाषणातून दिली आहे. शहराचे जीवन खालच्या दर्जाचे आहे. साडे सहा कोटी लोक ४०० शहरात सध्या राहतात. त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता प्रथम ज्या कोणाच्या लक्षात आले असेल तर ते आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाच्या ६५ टक्के जीडीपी हा शहरात तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरात होते. स्वयंरोजगाराची संधी शहरात होते. त्यामुळे शहरे सक्षम झाली पाहिजेत ही संकल्पना भारतीय जनता पार्टीची आहे असे ते म्हणाले.
या जाहीर सभेला विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके, माजी खासदार सुनील मेंढे, भंडारा-गोंदिया समन्वयक बाळा अंजनकर, जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाने, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, बाळाभाऊ काशिवार, माजी जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, मोहन सुरकर, विनोद बांतें, प्रशांत खोब्रागडे, सचिन कुंभलकर, त्याचप्रमाणे भंडारा नगर परिषद ची नगराध्यक्ष उमेदवार मधुरा मदनकर, पवनीच्या उमेदवार भावना भाजीवाले, साकोली च्या उमेदवार देवश्री कापगते, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेचे उमेदवार सभास्थळी उपस्थित होते.
भंडारा शहराच्या नगराध्यक्षांकरिता उभ्या झालेल्या उमेदवार मधुराताई मदनकर व त्यांचे पती मिलिंद मदनकर यांच्या कार्याचा सुद्धा गौरव त्यांनी याप्रसंगी केला दहा वर्षे मधुरा मदनकर व दहा वर्षे त्यांचे पती मिलिंद मदनकर हे नगरसेवक म्हणून शहरातील जनतेच्या सेवेत होते जनतेच्या आशा अपेक्षा व समस्या त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या सर्व योजनांची माहिती त्यांना आहे असे ते म्हणाले.
या सभेदरम्यान त्यांनी भंडारा शहराच्या समस्यांवर सुद्धा प्रकाश घातला. पोट भरण्यासाठी रोजगाराची संधी शोधत खेड्यातून शहरात आलेल्या अनेकांची घरे अतिक्रमणाच्या विडक्यात सापडली आहेत मात्र यातून मार्ग काढीत दोन महिन्यापूर्वी आपण शासनाचे जीआर काढून झोपडपट्टीतील अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे व घरे मोफत देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ७० वर्षापासून पट्ट्यांच्या शोधात असलेल्या सिंधी समाजाच्या समस्यांचे आपण निवारण केले आहे. झुडपी जंगलाच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांसाठी ८ वर्षे लढल्याने सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूला लागलेला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेवर भाजपाचे उमेदवार का म्हणून निवडून द्यावे याबाबत बोलतांनी त्यांनी आपण करणार असलेल्या विकासाचे विस्तृत वर्णन केले. भंडारा शहरात कचऱ्यापासून गॅस, इलेक्ट्रिसिटी तयार करणार, प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हर घर जल तसेच अमृत धारा योजनेतून खेळाचे मैदान, उद्यान तलावाचे संवर्धन व सौंदर्यकरण नाल्या गटारे व मजबूत सिमेंट रस्ते एवढेच नाही तर गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया, गोंदिया ते गडचिरोली या शहरांना समृद्धी महामार्ग जोडले जाणार आहे. मात्र यात विशेष म्हणजे या सर्वांचे जंक्शन हे भंडारा राहणार आहे. परिणामी उद्योगांचा विस्तार होऊन भंडारा जिल्ह्यातील लाखो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. वैनगंगा नदीवरील अनेक प्रोजेक्ट मुळे भंडारा मध्ये पर्यटनाचे सर्किट तयार होणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
या जाहीर सभेला संबोधित करतांनी त्यांनी जनतेला आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहोत हे सांगितले आहे. मला कोणत्याही पक्षावर टीका करण्याची गरज नाही. मी एक सकारात्मक मत मागण्या करिता आलो आहे. माझ्याकडे प्रत्येक शहराचा विकासाचा आराखडा आहे. शहर कसा बदलेल शहरातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्ग यांचा जीवनमान कसा उंचावेल याकरिता काय काय करायचे आहे. याबाबतचा विकास आराखडा मी तयार केलेला आहे. पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा आता मतांच्या पेटीतून शहराचा विकासात्मक राजा आपल्याला जन्माला घालायचा आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे हात मजबूत करून उमेदवारांना आशीर्वाद द्यावे अशी भावनिक साद त्यांनी याप्रसंगी शहर वासीयांना घातली आहे.
या जाहीर सभेला जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेचे उमेदवार, मतदार व मतदार, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!