A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेक्राइमपुणेमहाराष्ट्र

लोणीकंद पोलीसांनी जबरी चोरी करणारे दोघांकडुन एक वाहन, ०१ देशी बनावटीचे पिस्तुल व ०३ जिवंत काडतुसे केली हस्तगत.

*लोणीकंद पोलीसांनी जबरी चोरी करणारे दोघांकडुन एक वाहन, ०१ देशी बनावटीचे पिस्तुल व ०३ जिवंत काडतुसे केली हस्तगत.

(पुणे शहरातील गुन्हेगारीस आळा लोणीकंद पोलसांनी जप्त मागील ३० दिवसात ०८ देशी बनावटीचे पिस्तुल व २६ जिवंत काडतुसे केली जप्त..)

लोणीकंद पोलीस स्टेशन, गु.र.नं. ८८५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), १२६(२). ३५१(२).३(५). ३२४(४) अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी हे त्यांचे ताब्यातील मंहिद्रा कंपनीची XUV 300 गाडी नं. एम एच १५ जेएस १०८८ या गाडीने नगरकडुन पुणे कडे येत असताना आरोपीतांनी फिर्यादीची गाडी अडवुन त्यांचा मोबाईल व गाडी जबरीने चोरी करुन घेवुन गेले म्हणुन दिनांक १४/०९/२०२४ रोजी वरील प्रमाणे गुन्हा

दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयात मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ ४ पुणे शहर, व मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सोो, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या.

नमुद गुन्हयाचा तपास चालू असताना दिनांक २८/०९/२०२४ रोजी पहाटे पोलीस नाईक ७४१९ स्वप्निल जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सपोनि रविंद्र गोडसे व पोलीस अंमलदार पोलीस नाईक ७४१९ स्वप्निल जाधव, पोलीस नाईक ७६२१ कैलास साळुंके, पोलीस नाईक ७४४७ अजित फरांदे, पोलीस शिपाई ४५८५ साईनाथ रोकडे, पोलीस शिपाई २६०८ विशाल गायकवाड यांनी बांगर वस्ती रोड, केसनंद या ठिकाणी सापळा रचुन दोन इसम नामे १) सचिन राजाराम ढोरे, वय ३८ वर्षे, धंदा शेती रा. ढोरे वस्ती, मौजे केसनंद ता. हवेली जि. पुणे. २) मंथन दत्तात्रय धुमाळ, वय २६ वर्षे, धंदा बाऊंन्सर रा. प्लॅट नं. ओ / २ एरंडे हाईटस, साईनगर, खराडी चंदननगर पुणे यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली एक मारुती स्विप्ट कार तसेच अंगझडतीमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्तुल व ०३ जिवंत काडतुसे असा एकुण ५,२३,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त करुन नमुद आरोपी यांना दाखल गुन्हयात आज दिनांक २८/०९/२०२४ रोजी अटक करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अदयापावेतो झालेल्या तपासात यापुर्वी ०१ आरोपी पोलीस कस्टडीत असुन आज रोजी अटक केलेल्या दोन आरोपीतांना मा. न्यायालयाने दिनांक ३०/०९/२०२४ रोजी पर्यंत ०२ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री. रविंद्र गोडसे हे करीत आहेत. अशा प्रकारे लोणीकंद पोलीसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांचे नेतृत्वाखाली मागील ३० दिवसात ०८ देशी बनावटीचे पिस्तुल व २६ जिवंत काडतुसे जप्त करुन पुणे शहरातील गुन्हेगारीस आळा घालुन मोठी कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. हिम्मत जाधव साो. पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त सोो. येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती अनुजा देशमाने सो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर (अतिरिक्त कार्यभार) यांचे मार्गदर्शनाखाली मा. पंडीत रेजितवाड साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सागर जगताप, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोकरे, सुधीर शिवले, विशाल गायकवाड, प्रशांत कापुरे, सागर कड्डु, शुभम सातव सर्व लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.

Vande Bharat Live Tv News
Show More
Back to top button
error: Content is protected !!