A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरे

भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी नीलेश लंके यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी ) : भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. लंके यांची या समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने उर्जा क्षेत्रात नगर जिल्ह्यास फायदा होणार आहे.उर्जा मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या राज्य मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी काही सदस्यांचा त्यात समावेश करण्यात येतो. या सदस्यांच्या निवडीमध्ये खा. नीलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. काही निवडक मंत्रालयांपैकी एक असलेल्या उर्जा मंत्रालयात स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून मंत्रालयाच्या कारभार योग्य पध्दतीने व्हावा यासाठी स्थायी समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्यात येणार आहेत. या बैठकांमध्ये समितीचे सदस्य योग्य त्या सुचना, तक्रारी करून योग्य निर्णय घेण्यास भाग पाडतील.कोणताही देश विकसित होताना उर्जेची सर्वात महत्वाची प्राथमिक गरज असते. अगदी घरगुती वापराबरोबरच व्यवसायीक, उद्योजकांना उर्जेची मोठया प्रमाणावर गरज असते. उर्जेचा वापर मोठया प्रमाणावर होत असल्याने औद्योगिकरणाचा तो श्‍वास माणला जातो. देशाच्या अशा महत्वपूर्ण मंत्रालयाच्या स्थायी समितीवर काम करण्याची संधी खा. लंके यांना मिळाली आहे.नगर जिल्ह्याला फायदा होणार खासदार नीलेश लंके हे ज्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात तो भाग बहुतांश ग्रामीण आहे. या भागातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांसाठी वीजेचा प्रश्‍न आजही महत्वाचा आहे. या प्रश्‍नाची चांगली जाण खा. लंके यांना आहे. त्यामुळे या मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाचा फायदा नगर जिल्हयासाठी निश्‍चित होईल यात शंका नाही.

वंदे भारत टीव्ही न्यूज करिता शहाजी दिघे
Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!