मंगळवार दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी स.१०.३० पासुन पुणे म.न.पा.च्या अधिकाऱ्यांकडुन लेखी स्वरुपात कार्यवाही होत नाही तो पर्यंत घुले वस्ती, मांजरी बु. येथील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
कॅनॉल रस्त्याचा विषय गंभीर व धोकादायक झाल्यामुळे हजारो नागरिक, विद्यार्थी, पालक व महीला भगिनी यांना मानसिक तणावाखालुन या ठिकाणाहुन प्रवास करावा लागत आहे. सदरचा रस्ता भारतीय किसान संघाचे महा. प्र. कार्यकारीणी सदस्य श्री. राजन तुपे व शिवसेना (शिंदे गटाचे पुणे
जि.प्रमुख) श्री. उल्हासभाऊ तुपे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून रस्त्याच्या दोन्ही बाजुला RCC सिमेंट सुरक्षा भिंती बांधुन रस्ता सिमेंटीकरण करण्याची मागणी केली आहे. परंतु ढम्म प्रशासक व शासन यांनी सदर रस्त्याच्या मागणी बाबत दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मांजरी हडपसरकडे जाण्याचा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे तरी या आंदोलनात नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सामिल व्हावे ही नम्र विंनती. टिप – सदर आंदोलनाचे वेळी स्कुल बस, अॅब्युलन्स इ. वाहनांना विरुद्ध दिशेने मार्ग करुन दिला जाईल.
तसेच इतर वाहनांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, ही विनंती