A2Z सभी खबर सभी जिले की

चोरीस गेलेले  मोबाईल बंडगार्डन पोलीस स्टेशन कडुन हस्तगत.

 

*चोरीस गेलेले  मोबाईल बंडगार्डन पोलीस स्टेशन कडुन हस्तगत.

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन स्थानिक तसेच बाहेरुन आलेले किंवा चाललेल्या बहुतेक लोकांचे महागडे मोबाईल फोन हे दिवसा किंवा रात्रीच्या अंधारात चोरीस / हरविले/गहाळ झाले होते. केंद्र शासनाचे दुरसंचार विभागाव्दारे हरविलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळविणे करीता CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर तक्रारी प्राप्त झाल्या, सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा. अमितेष कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशान्वये व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गहाळ मोबाईलचा बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील सायबर पथकाचे पोलीस उप निरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस नाईक विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे व पोअं निलेश पालवे यांनी करुन लोकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन यांचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचा एसडीआर तसेच लोकेशन यांचेव्दारे शोध घेवुन सदर गहाळ मोबाईल पैकी आज पावतो अंदाजे ५ लाख किंमतीचे एकुण ५१ मोबाईल फोन हस्तगत केले.

सदरची कामगीरी मा. अमितेष कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे, मा दिपक निकम, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर व बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो.नि. रविद्रं गायकवाड, पो.नि.गुन्हे संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी परमेश्वर गर्कळ, पोना विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे, पोअं निलेश पालवे, पोअं शशांक खाडे, पोअं प्रसाद पवार, पोअं ज्ञानेश्वर गायकवाड, पोअं विशाल जाधव यांचे पथकाने केली.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!