A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेपुणेमहाराष्ट्र

मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यात भीषण अपघात

राजू बावडीवाले (प्रतिनिधी पुणे शहर )

मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यात भीषण अपघात   एका मद्यधुंद डंपर चालकांना 9 जणांना चिरडले. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाटा येथे हा अपघात घडला. अपघातातील जखमी हे स्थलांतरीत कामगार असून अमरावती येथून आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Vande Bharat Live Tv News
Show More
Back to top button
error: Content is protected !!