A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

योग नृत्याचे एकाच दिवशी चार शाळेत शिबिर संपन्न!

संजय पारधी चंद्रपुर महाराष्ट्र

चंद्रपुर : योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरच्या वतीने एकाच दिवशी व एकाच वेळेस चार शाळेमध्ये योग नृत्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.*
*योग नृत्याचे जनक “भाई श्री गोपाल जी मुंधडा” यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रभारी सुरेश भाऊ घोडके, किशोरी ताई शिरोडकर महिला जिल्हा प्रभारी, प्रशांत कस्तुरवार सांस्कृतिक मंत्री, अशोक पडगिलवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, कोर कमिटी मेम्बर / केंद्र प्रमुख संतोष पिंपळकर, तूकून येथील पंडित दीनदयाल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजयालक्ष्मी ताई पुंडले, सर सय्यद उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रफिया खातुर, कर्मवीर कन्नमवार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बेबीताई उईके, बाबू पेठ येथील हिंगलाज भवानी हायस्कूलचे संस्थापक संजय कोटणाके, मुख्याध्यापिका निर्मला मेहरकुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वडियालवार इत्यादी मान्यवरांनी शिबिराचे आयोजन केले होते.*
*विद्यार्थ्यांच्या बाल मनावर योग नृत्याचे संस्कार घडावेत,* *व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, मन शांत राहून बुद्धीचा विकास व्हावा,अभ्यासामध्ये मन लागून विद्यार्थी हुशार व्हावेत , तंदुरुस्त जीवन जगण्यात मदत होते , निरोगी शरीरासाठी योगा आवश्यक आहे, हाच विचार मनात बाळगून योग नृत्याचे जनक “भाई श्री गोपाल जी मुंधडा” यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे परिसरामध्ये 100 च्या आसपास योग नृत्याचे निशुल्क शिबिर सुरू आहेत, करिता जनतेने याचा फायदा घ्यावा असे कडकडीचे आव्हान केले आहे. पंडित दीनदयाल प्राथमिक शाळा व सर सय्यद उर्दू प्राथमिक शाळेत माता मंदिर चे केंद्रप्रमुख नीता बेरशेट्टीवार, सांस्कृतिक मंत्री छाया हिरोडे, शुभांगी उपगंडलावार, प्रेमीला जांभुडे, माधुरी शेंडे कर्मवीर कन्नमवार प्राथमिक शाळेत पोलीस मुख्यालय फुटबॉल ग्राउंडच्या केंद्रप्रमुख निशाताई राजपूत, संगीता जुनगरे,राधा देवगिरकर, अर्चना देवरे, समिता जैन व नीता नागतुरे.
*बाबूपेठ येथील, “हिंगलाज भवानी हायस्कूल” येथे संघटन मंत्री तथा ट्रेनर सुरज गोडमारे, प्रकाश गुंठेवार, बंडू भाऊ देवोजवर, अश्विनी अलगमवार, यशवंत निखार, वैष्णवी मॅडम इत्यादींनी योग नृत्याचे धडे दिले, शिबिर यशस्वी करण्याकरिता संघटक तथा केंद्र प्रभारी विठ्ठल देशमुख, सतीश रेड्डी, निशा मंगर, शालू येरमे, सीमा मडावी व गौरी बेरशेट्टीवार.
तसेच सर्व शाळेच्या शिक्षिका, शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग इत्यादींनी अथक परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले. विद्यार्थी व विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवीत संगीताच्या तालावर योग नृत्य करिता आनंद लुटला.

Back to top button
error: Content is protected !!