A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*गुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा भेट!* ------------------------------------- *गुरुनानकदेवजींच्या शिकवणींनी समाजात बंधुता, सेवा आणि एकतेचा संदेश दिला –मा.खा. डॉ. नेते*

*गुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा भेट!* ------------------------------------- *गुरुनानकदेवजींच्या शिकवणींनी समाजात बंधुता, सेवा आणि एकतेचा संदेश दिला –मा.खा. डॉ. नेते*

प्रेस नोट
सावली,चंद्रपुर

*गुरुनानक जयंतीनिमित्त माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची किसाननगर गुरुद्वारा येथे सदिच्छा भेट!*
————————————-
*गुरुनानकदेवजींच्या शिकवणींनी समाजात बंधुता, सेवा आणि एकतेचा संदेश दिला –मा.खा. डॉ. नेते*

सावली, दि. ०४ नोव्हेंबर २०२५
श्री गुरुनानक शाही गुरुद्वारा सेवा समिती, किसान नगर (ता. सावली, जि. चंद्रपूर) यांच्या वतीने उद्या गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र प्रसंगी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गुरुद्वारा येथे भेट देऊन श्री गुरुनानक देवजींच्या प्रतिमेस नतमस्तक होऊन पूजन-अर्चा केली.

मा.खा.डॉ. नेते यांनी यावेळी गुरुद्वाऱ्यात उपस्थित महिला, बंधू-भगिनींशी संवाद साधत गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना गुरुनानकदेवजींच्या शिकवणींचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रामुख्याने गुरुद्वारा सेवा समितीचे अध्यक्ष कर्मवीर कुडावले, चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिष पिपरे, भाजप बूथ प्रमुख मुकेश बिके, तसेच पमीसिंग सलुजा, राजकुमार गलगट, विजय मजोके, रीना कलीये, शशिकला कुडावले, रिया गलगट आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने गुरुनानक भक्त बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.
गुरुद्वाऱ्यात या दिवशी कीर्तन, लंगर सेवा व गुरुवचन पठणाचा कार्यक्रम भाविकांनी आयोजित करण्यात आले आहे हे श्रद्धापूर्वक अनुभवायला मिळेलच

मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी या भेटी प्रसंगी सदिच्छा देत
“श्री गुरुनानक देवजी हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर त्यांनी संपूर्ण मानवजातीस एकतेचा, प्रेमाचा आणि सेवाभावाचा अमूल्य संदेश दिला.
त्यांचे जीवन हे करुणा आणि समतेचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी त्यांचा आदर्श आपल्या कृतीतून जगवावा, हीच खरी गुरुपूजा ठरेल,”असे माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी या प्रसंगी सांगितले.

या भेटीद्वारे गुरुद्वारा परिसरात आध्यात्मिक वातावरण व सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून, उपस्थित भाविकांनी डॉ. नेते यांचे मन:पूर्वक स्वागत केले.
गुरुनानक जयंतीनिमित्त हा कार्यक्रम बंधुता, श्रद्धा आणि सेवाभावाने ठरला.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!