
*१२ ला जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन* विलास केजरकर भंडारा.
*१२ ला जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन* विलास केजरकर भंडारा.
प्रेस विज्ञप्ति
भंडारा
*१२ ला जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन*
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन खेळ मंत्रालयाच्या वतीने केले जाते. राज्यात सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तर युवा महोत्सव दि. १२ नोव्हेंबर २०२५ होणार आहे. पोलीस बहुद्देशीय हॉल येथे आयोजित केली आहे
जिल्हा युवा महोत्सवा अंतर्गत वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, विज्ञानदर्शन असे उपक्रम होणार आहेत. यात १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी आणि युवा मंडळांना सहभागी होता येईल. इच्छुकांनी ११ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfp6TZSWhjrWfyPKmKp7NwHFnyb8KWcRNYCdy7xvVg3J4xHlw/viewform संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. स्पर्धेच्या वेळी येतांना २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत, जन्म दाखला झेरॉक्स प्रत व बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन येणे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता आकाश गायकवाड ९१३०२५३४७३
अविनाश निंबार्ते -७५०७४९३०९४ यांच्या शी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले आहे.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015












